
छत्तीसगडचा रहिवासी सौरभ चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल दुबई हे चालवतात. या दोघांविरोधात लूक आऊट परिपत्रक जारी करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसापासून ‘महादेव अॅप’ (Mahadev App) चांगलचं चर्चेत आहे. या बेटिंग अॅपच्या घोटाळ्यात अनेक बड्या हस्तींची नावं आल्यानं या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे. नुकतचं या प्रकरणी आता तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. आता मात्र, या प्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. महादेव गेमिंग अॅपचा मालक रवी उप्पलला अखेर दुबईत ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासोबत आणखी २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रवी उप्पल यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
हे सुद्धा वाचा
रवीसोबत आणखी 2 जणांना घेतलं ताब्यात
यासोबतच रवी उप्पल हे एकटे नसून त्याच्याशिवाय 2 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. सर्व भारतीय तपास यंत्रणा दुबई सुरक्षा एजन्सीच्या संपर्कात आहेत. रवी उप्पल हा महादेव अॅपच्या मुख्य आरोपींपैकी एक आहे, तो या गेमिंग अॅपचा मालक असल्याचेही सांगितले जात आहे. त्याला लवकरच अटक करून आकरण्यात येईल.










