Mahabaleshwar Fog : साताऱ्यात पारा 41 अंशावर, महाबळेश्वरमध्ये धुकं

0
23


Mahabaleshwar Fog : साताऱ्यात पारा 41 अंशावर, महाबळेश्वरमध्ये धुकं  एका बाजूला सूर्य आग ओकतोय तर दुसऱ्या बाजूला राजकीय तापमान वाढताना पाहायला मिळत आहे. अशात मात्र महाबळेश्वर मध्ये एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये चक्क आणि चक्क धुक्यांचे आणि ढगांचे लोटच्या लोट सह्याद्रीच्या पर्वतरांगांना जणू गिळंकृत करत आहेत. दिवसेंदिवस राज्यातला तापमानाचा पारा अधिकाधिक होताना पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील आजचा पारा 41अंशांचा पार असताना एका बाजूला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील महाबळेश्वर मधला हा नजारा म्हणजे आश्चर्यजनकच मानला जात आहे. हा अद्भुत नजारा आणि हे वातावरण अनुभवायचं असेल तर नक्कीच या अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात महाबळेश्वरला जाणं आता पर्यटक पसंत करतील यात शंका नाही



Source link