
“मेरा पिया घर आया” हे गाणे १९९५ साली प्रदर्शित झालेल्या याराना या चित्रपटातील आहे. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. तसेच या चित्रपटातील “मेरा पिया घर आया” गाण्यावरील माधुरीच्या डान्सने अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावले होते. आता या गाण्याचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोबतच या गाण्यात सनी लिओनी दिसत असल्यामुळे सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.






