
Truck Accident Lonavla News Marathi : पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानाच आता लोणावळ्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक चिक्कीच्या दुकानात शिरल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, परंतु चिक्कीच्या दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबई-पुणे महामार्गावर पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर ही घटना घडली आहे. या भीषण अपघातात कुणीही जखमी झालेलं नसून दोन वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय काही दुकानांच्या भिंती पडल्या आहे. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.






