Loksabha Elections 2024 | सरकार स्थापनेपूर्वीच नीतीश कुमार यांच्या भाजपकडे ‘या’ अटी; अग्नीवीर योजना व UCC बाबत मोठी मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
Loksabha Elections 2024 | सरकार स्थापनेपूर्वीच नीतीश कुमार यांच्या भाजपकडे ‘या’ अटी; अग्नीवीर योजना व UCC बाबत मोठी मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)


सरकार स्थापनेपूर्वीच नीतीश कुमार यांच्या भाजपकडे ‘या’ अटी; अग्नीवीर योजना व  UCC बाबत मोठी मागणी

तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्यासाठी नीतीश कुमार व  चंद्राबाबू नायडू यांची साथ भाजपला घ्यावी लागणार आहे. सरकार स्थापन करण्यापूर्वी नीतीश कुमार यांनी त्यांच्या अटी व मागण्या सांगितल्या आहेत.

दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. मात्र या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अब की बार 400 पार असा नारा देणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे देशामध्ये एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी व नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार व  टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र सरकार स्थापनेपूर्वीच नीतीश कुमार भाजपला काही अटी घातल्या आहेत. त्याचबरोबर मोदी सरकारने घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत देखील त्यांनी मत मांडली आहेत. त्यामुळे सरकारस्थापनेपूर्वीच नीतीश कुमार व भाजपमध्ये राजकारणाला सुरुवात झाली आहे.

देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला. उत्तर प्रदेश व महाराष्ट्रामध्ये भाजपला अपेक्षित असे यश आलेले नाही. राम मंदिराचा मुद्द चर्चेमध्ये असताना देखील अयोध्येमध्ये भाजपला अपयश आले. त्याचबरोबर भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री देखील निवडणुकीमध्ये यश मिळवण्यास अपयशी ठरले. स्मृती इराणी यांना देखील पराभवाचा फटका बसला. जोरदार प्रचारानंतर देखील भाजपला सरकार बनवण्यासाठी इतरांच्या मदतीची गरज भासत आहे. यासाठी त्यांना जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार व  टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू मदत करणार आहेत. नीतीश कुमार यांच्याकडे 12 आणि चंद्राबाबू नायडूंकडे 16 खासदार आहेत. दोघांचे मिळून 28 खासदार होतात. त्यानंतर एनडीए सरकार जादूयी आकडा गाठून सरकार स्थापन करणार आहे.






Source link