lok sabha news : अल्पवयीन मुलीवर रेप, मॉब लिंचिंगसाठी फाशी, देशद्रोहाचा कायदाही मागे; लोकसभेत ३ विधेयके मंजूर

0
24
lok sabha news : अल्पवयीन मुलीवर रेप, मॉब लिंचिंगसाठी फाशी, देशद्रोहाचा कायदाही मागे; लोकसभेत ३ विधेयके मंजूर


Bharatiya Nyaya Sanhita: ब्रिटिश काळापासून चालत असलेले तीन क्रिमिनल कायद्यांच्या जागी लोकसभेने नव्या तीन विधेयकांना बुधवारी मंजुरी दिली. सभागृहात लांबचलक चर्चेनंतर व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सविस्तर उत्तरानंतर भारतीय न्याय संहिता (BNS) विधेयक २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) विधेयक २०२३ आणि भारतीय साक्ष्य (BS) विधेयक २०२३ ला आवाजी मतांनी मंजुरी दिली. हे तीन विधेयकभारतीय दंड संहिता (IPC), १८६०, दंड प्रक्रिया संहिता (CrPC) १०९८ आणि भारतीय साक्ष्य अधिनियम १८७२ च्या जागी अंमलात आणले जातील.



Source link