Lok Sabha Elections 2024 | उद्धव ठाकरेंना माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी महाराष्ट्राला सांगावं…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आव्हान | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
Lok Sabha Elections 2024 | उद्धव ठाकरेंना माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी महाराष्ट्राला सांगावं…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आव्हान | Navarashtra (नवराष्ट्र)


उद्धव ठाकरेंना माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी महाराष्ट्राला सांगावं…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आव्हान

भाजप नेते अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने उमेदवारांची दुसरी यादी देखील जाहीर केली आहे. निवडणूकीपूर्वी भाजपने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) बाबत मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने सोमवारी हा निर्णय लागू केला. यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली असून जहरी टीका केली. यानंतर आता भाजप नेते अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केल्यानंतर उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या जाऊ लागल्या आहेत. अमित शाह म्हणाले, “सीएए कायद्यात विविध तरतुदी आहेत. सहाव्या सूचीत जी क्षेत्रं आहेत तिथे सीएए लागू होणार नाही. कुणी तिथून अर्ज केला तरीही तिथून ते स्वीकारलं जाणार नाही. सीएए कायदा हा भारताचं नागरिकत्व देणारा कायदा आहे. कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा कायदा नाही. केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांना कायदा नाकारण्याचा अधिकार नाही. कारण संसदेचा तो अधिकार आहे. हा विषय केंद्राचा आहे. केंद्र आणि राज्यांचा विषय नाही असे मत अमित शाह यांनी मांडले.






Source link