Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, ‘या’ शहरांतील बँका बंद! पाहा यादी

0
8
Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, ‘या’ शहरांतील बँका बंद! पाहा यादी

Lok Sabha Elections Phase 6: लोकसभा निवडणूक २०२४ च्या सहाव्या टप्प्यासाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५८ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून त्यात दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात बिहार (८ जागा), हरियाणा (सर्व १० जागा), जम्मू-काश्मीर (१ जागा), झारखंड (४ जागा), दिल्ली (सर्व ७ जागा), ओडिशा (६ जागा), उत्तर प्रदेश (१४ जागा) आणि पश्चिम बंगाल (८ जागा) या राज्यांचा समावेश आहे.

Source link