Lok Sabha election results 2024 | इंदूरमध्ये NOTA ने मोडला विक्रम, तब्बल 2.18 लाख लोकांनी दिली नोटाला मते | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
Lok Sabha election results 2024 | इंदूरमध्ये NOTA ने मोडला विक्रम, तब्बल 2.18 लाख लोकांनी दिली नोटाला मते | Navarashtra (नवराष्ट्र)


इंदूरमध्ये NOTA ने मोडला विक्रम, तब्बल 2.18 लाख लोकांनी दिली नोटाला मते

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून इंदूर लोकसभा मतदारसंघात वेगळे निकाल पाहायला मिळत आहेत. NOTA ला दोन लाख मते मिळाली आहेत, हा एक विक्रम आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे संपल्यानंतर आज मतमोजणी सुरू आहे. अशात मध्य प्रदेशातील इंदूरची जागा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर मतदारसंघात 2.18 लाख मतदारांनी NOTA पर्याय निवडला, जो एक नवीन विक्रम आहे. एकूण मतदारांपैकी 14.01 टक्के मतदारांनी NOTA चा पर्याय निवडला. यापूर्वी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, बिहारच्या गोपालगंज भागातील 51,660 मतदारांनी (पाच टक्के) NOTA पर्याय निवडून विक्रम केला होता.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सप्टेंबर 2013 मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ‘NOTA’ बटण समाविष्ट करण्यात आले होते. निवडणूक आयोगानुसार, एकूण मतदारांपैकी 4.62 लाख (0.99 टक्के) मतदारांनी NOTA ची निवड केली. यापूर्वी, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 61,31,33,300 मतांपैकी NOTA ला 65,14,558 (1.06 टक्के) मते मिळाली होती. त्याचप्रमाणे, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या 55,38,02,946 मतांपैकी 60,02,942 (1.08 टक्के) मते NOTA साठी होती.






Source link