Lok sabha Election Result 2024 | …म्हणून ‘सपा’ बनला देशातील तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष, पाहा अखिलेश यादवांची खेळी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Lok sabha Election Result 2024 | …म्हणून ‘सपा’ बनला देशातील तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष, पाहा अखिलेश यादवांची खेळी | Navarashtra (नवराष्ट्र)


…म्हणून ‘सपा’ बनला देशातील तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष, पाहा अखिलेश यादवांची खेळी

Lok sabha election result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वात मोठी उलथापालथ यूपीमध्ये पाहायला मिळाली. भाजपला समाजवादी पक्षाच आणि त्यांचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठा धक्का दिला आहे. हा विजय अखिलेश यादव यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल एनडीएसाठी धक्कादायक आहे. विशेषत: भाजपला जोरदार झटका हा उत्तर प्रदेशातून मिळाला आहे. कारण गेल्या निवडणुकीत भाजपला लाखो मतांची आघाडी होती, पण लोकसभा निवडणुकीच्या 2024 (lok sabha election 2024) च्या निकालात समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि काँग्रेसन सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मोदी सरकार आणि योगी सरकारचे अनेक मंत्री स्वबळावर निवडणूक हरले आहेत. पंतप्रधान मोदी वाराणसीतून केवळ दीड लाख मतांनी विजयी होऊ शकले. तर दुसरीकडे अयोध्या आणि प्रयागराजसारख्या जागाही भाजपच्या हातातून गेल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत सपाने आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. एकूण 37 जागा जिंकल्या. अशा प्रकारे सपा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे. सपाला हे यश धार्मिक मुद्द्यांऐवजी जातीय एकत्रीकरणाच्या रणनीतीमुळे आणि यादव आणि मुस्लिमांवर कमी दाबाने मिळाले.






Source link