Lok Sabha Election | तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; भाजप नेते दिलीप घोष यांच्या ताफ्यावर हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)

0
13
Lok Sabha Election | तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; भाजप नेते दिलीप घोष यांच्या ताफ्यावर हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)


तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; भाजप नेते दिलीप घोष यांच्या ताफ्यावर हल्ला

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या आठ जागांवर सुरू असलेल्या मतदानादरम्यान हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या.

कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या आठ जागांवर सुरू असलेल्या मतदानादरम्यान हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. हिंसाचारग्रस्त बीरभूम आणि वर्धमान-दुर्गापूर मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला.

ईव्हीएम बिघाड झाल्याचा आणि एजंटांना मतदान केंद्रांवर प्रवेश करण्यापासून रोखल्याचा आरोप करणाऱ्या विविध राजकीय पक्षांनी आतापर्यंत 1,088 तक्रारी दाखल केल्या आहेत. वर्धमान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघातील सुसुनिया भागात दुपारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा समर्थकांमध्ये हाणामारी झाली, जेव्हा भाजपाचे उमेदवार दिलीप घोष मतदान केंद्रावर अनियमिततेची तक्रार मिळाल्यानंतर निवडणूक बूथवर जात होते.






Source link