Lok Sabha Election | पंतप्रधान मोदी 15 मे ला करणार मुंबईत रोड शो; महाराष्ट्रात होणार 17 वी सभा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
Lok Sabha Election | पंतप्रधान मोदी 15 मे ला करणार मुंबईत रोड शो; महाराष्ट्रात होणार 17 वी सभा | Navarashtra (नवराष्ट्र)


पंतप्रधान मोदी 15 मे ला करणार मुंबईत रोड शो; महाराष्ट्रात होणार 17 वी सभा

राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी (Lok Sabha Election) मतदान होणाऱ्या मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झांझावाती दौरा होणार आहे. यात मोदी मुंबईत 15 मे रोजी रोड शो करणार असून, 17 मे रोजी त्यांची जाहीर सभा होणार आहे.

मुंबई : राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी (Lok Sabha Election) मतदान होणाऱ्या मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा झांझावाती दौरा होणार आहे. यात मोदी मुंबईत 15 मे रोजी रोड शो करणार असून, 17 मे रोजी त्यांची जाहीर सभा होणार आहे. निवडणूक प्रचारार्थ मोदींच्या राज्यात आजवर 16 सभा झाल्या असून, ही 17 वी सभा असणार आहे.

मुंबईत लोकसभेच्या 6 जागा असून, तेथे विजयासाठी भाजपने ‘मेगा प्लान’ तयार केला आहे. त्यानुसार मोदी यांचा 15 मे रोजी ईशान्य मुंबईत भव्य रोड शो होणार आहे. तसेच 17 रोजी पंतप्रधानांची मुंबईत पहिली जाहीर सभा होणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मोदींच्या राज्यातील सभा वाढल्या आहेत.






Source link