
EVM Viral Video : एकाच वोटरने भाजपला ८ वेळा मतदान दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला घेरले आहे. सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनी X वर पोस्ट करत लिहिले आहे की, जर निवडणूक आयोगाला वाटत असेल की, हे चुकीचे आहे तर काही कारवाई जरूर करा. भाजपची बूथ कमेटी, लूट कमेटी आहे. व्हायरल व्हिडिओवर काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिले की, निवडणूक आयोगजी,पाहत आहात ना, एक मुलगा ८-८ वेळा मतदान करत आहे.आता तर जागे व्हा. दरम्यान काँग्रेसच्या पोस्टवर एका युजरने लिहिले की, EVMचा बहाना सुरू? हे कुठले ठिकाण आहे? तुमचा पोलिंग एजेंट तेथे नाही का? तुम्ही (काँग्रेस) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की केवळ सोशल मीडियावर EVM वर रडगाणे सुरू?








