Lok Sabha 2024 | वरुण गांधींना भाजपकडून तिकीट नाकारलं; आता करणार आई मनेका गांधी यांचा प्रचार | Navarashtra (नवराष्ट्र)

0
9
Lok Sabha 2024 | वरुण गांधींना भाजपकडून तिकीट नाकारलं; आता करणार आई मनेका गांधी यांचा प्रचार | Navarashtra (नवराष्ट्र)


varun gandhi

भाजपने पिलीभितीमधून तिकीट नाकारल्यानंतर आता भाजप नेते वरूण गांधी यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.

पिलीभीत : भाजपने पिलीभितीमधून तिकीट नाकारल्यानंतर आता भाजप नेते वरूण गांधी यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. वरुण गांधी लोकसभा निवडणुकीत सुलतानपूरमध्ये आई मनेका गांधी यांच्या निवडणुकीच्या प्रचारावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले आहे.

वरूण गांधी यांनी आपल्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला. भाजपाकडून यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी पिलिभीतमधून जितिन प्रसाद यांना पक्षाने संधी दिली आहे. वरुण गांधी यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतला होता, त्यानंतर ते भाजपविरोधात बंडखोरी करून पिलीभीतमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र, त्यांच्या टीमकडून एक निवेदन जारी करून या चर्चांना पूर्णविराम दिलाय.






Source link