
सरकारच्या नव्या निर्णयामुळं रेस्टॉरन्ट, बार, क्लब आणि कॅफेमधील मद्याचे दर वाढणार आहे. त्यामुळं तळीरामांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. पर्यटनासह महसूल वाढीसाठी देशातील अनेक राज्यांमध्ये स्पर्धा सुरू असताना राज्य सरकारने व्हॅट वाढवण्याच्या निर्णयावर बारचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय दिवाळीसह अनेक सणं काही दिवसांवर येवून ठेपलेली आहे. याशिवाय मद्यखरेदीसाठी लोकांना जास्त पैसे द्यावे लागणार असल्याने सरकारच्या महसूलात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोवा, चंदीगड आणि हरियाणाच्या तुलनेत महाराष्ट्रात दारू महाग मिळणार आहे.






