
दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात कथित मद्य घोटाळा झाल्याचा आरोप करत ईडीने वर्षभरापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. या कारवाईला आठवडा उलटत नाही तोच आम आदमी पक्षाचा आणखी एक मंत्री ईडीच्या फेऱ्यात अडकला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात कथित मद्य घोटाळा झाल्याचा आरोप करत ईडीने वर्षभरापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. या कारवाईला आठवडा उलटत नाही तोच आम आदमी पक्षाचा आणखी एक मंत्री ईडीच्या फेऱ्यात अडकला आहे.
ईडीने मंत्री कैलाश गहलोत यांना समन्स बजावले होते. त्यानंतर गहलोत तत्परतेने चौकशीला हजरही झाले. ते दिल्लीच्या नजफगड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दिल्ली सरकारमध्ये त्यांच्याकडे वाहतुक, गृह आणि विधी या खात्याची जबाबदारी आहे. गहलोत यांना मनी लाँड्रिंगच्य प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी बोलावण्यात आले होते. ईडीने त्यांची तास चौकशी केली.








