lion sita akbar case : बंगालच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाना मिळणार नवी ओळख! सीता, अकबर ऐवजी ‘ही’ नावे ठेवली जाणार

0
22
lion sita akbar case : बंगालच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाना मिळणार नवी ओळख! सीता, अकबर ऐवजी ‘ही’ नावे ठेवली जाणार


विश्व हिंदू परिषेदेणे या नावावर आक्षेप घेतल्यानंतरत हे प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात जाऊन पोहोचले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सिंह आणि सिंहिणीची नावे बदलण्याचे आदेश दिले होते. सिंहाचे नाव ‘अकबर’ आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ ठेवल्यामुळे हा सर्व वाद निर्माण झाला आहे. विहिंपने याला भावना दुखावणारे पाऊल म्हटले होते. कोलकाता उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली, तेव्हा न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या महाधिवक्त्यांना विचारले की, एखाद्या प्राण्याचे नाव देव, पौराणिक नायक, स्वातंत्र्यसैनिक किंवा नोबेल पारितोषिक विजेत्याच्या नावावर ठेवता येईल का? असा मलाच प्रश्न पडतो. पश्चिम बंगाल हे कल्याणकारी अन् धर्मनिरपेक्ष राज्य आहे. सीता आणि अकबराला सिंहाचे नाव देऊन वाद का निर्माण करताय? हा वाद टाळायला हवा होता, असंही न्यायमूर्ती म्हणाले. केवळ सीताच नाही तर मी कोणत्याही सिंहाला अकबर असे नाव देण्याचे समर्थन करीत नाही. तो एक अत्यंत कुशल आणि महान मुघल सम्राट होता. अत्यंत यशस्वी आणि धर्मनिरपेक्ष मुघल सम्राट होता. जर ते आधीच नाव दिले असेल तर राज्य प्राधिकरणाने ते बदलले पाहिजे, असंही न्यायमूर्तींनी अधोरेखित केले.



Source link