
अभिनेत्री क्रिती सेननचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. तिचे वडील राहुल सेनन हे सीए आहेत. तर, तिची आई गीता सेनन दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. इतकंच नाही, तर क्रितीने स्वतः इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. तिने नोएडा येथील कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. क्रिती सेनन एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना देखील आहे. केवळ नृत्यचं नाही तर, क्रिती राज्यस्तरीय बॉक्सर देखील आहे. पण, नंतर तिने अचानक फिल्मी दुनियेत एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला.








