Kriti-Pulkit Wedding Card: सलमान खानचा एक्स भावोजी अडकणार लग्न बंधनात! पुलकित-क्रितीच्या लग्नाची पत्रिका झाली लीक

0
17
Kriti-Pulkit Wedding Card: सलमान खानचा एक्स भावोजी अडकणार लग्न बंधनात! पुलकित-क्रितीच्या लग्नाची पत्रिका झाली लीक


पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांची ही लग्नपत्रिका ॲनिमेशनवर आधारित आहे, ज्यामध्ये एक मुलगा बाल्कनीत गिटार घेऊन बसलेला दिसत आहे. तर, तिथे त्याच्यासोबत एक मुलगीही बसलेली दिसत आहे. दोघेही एकत्र समुद्राकडे बघत आहेत. त्या दोघांसोबत दोन कुत्रेही त्यात दिसत आहेत. त्यावर कॅप्शनही लिहिलेय की, ‘माझ्या मित्रांसोबत हा खास क्षण सेलिब्रेट करण्यासाठी आता आणखी फारकाळ वाट पाहू शकत नाही. लव, पुलकित आणि कृती’. सोशल मीडियावर व्हायरल झालेली लग्न पत्रिका पाहिल्यानंतर चाहते या जोडीचे अभिनंदन करत आहेत. यावर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘आता आम्ही देखील फार वाट बघू शकत नाहीये.’ आणखी एकाने लिहिले की, ‘तुमचे खूप खूप अभिनंदन, हे कार्ड खूप सुंदर आहे.’ मीडिया रिपोर्टनुसार दोघे १३ मार्चला लग्न करणार आहेत.



Source link