
एसटीच्या धडकेत कामगार ठार, एकजण जखमी –
कोल्हापूर रोडवर एएससी कॉलेज चौकात एसटीच्या धडकेत सेंट्रिंग कामगार जागीच ठार झाला, तर आणखी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. विनायक नीलकंठ मट्टीकल्ली (वय ४०, रा. हनुमाननगर, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. कृष्णात धोंडीबा रजपूत (वय ५५, रा. जवाहरनगर) या गंभीर जखमीचे नाव आहे. जखमीवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




