Kolhapur: इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील ७६ गावांना धोक्याचा इशारा

0
16
Kolhapur: इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील ७६ गावांना धोक्याचा इशारा


महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार सुरू आहे. या पावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने ४३ बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली. इस्रोने केलेल्या सर्वेक्षणातून देशात भूस्खलनचा धोका असलेल्या १४७ जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली, या यादीत कोल्हापूरातील ७६ गावांचा समावेश आहे. यामध्ये राधानगरी (३१ गाव), शाहूवाडी (२० गाव) आणि भुदरगड तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे.



Source link