
किरण माने यांनी ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. यानिमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक जळजळीत पोस्ट शेअर करून आपण स्वतःला सिद्ध करून दाखवल्याचं म्हटलं आहे. किरण माने यांनी लिहिलेल्या या पोस्टमध्ये म्हटलेय की, ‘आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी परत येतोय, ताठ मानेनं, ताठ कण्यानं! दिड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी, ती घटना घडल्यावर मी सोशल मीडियावर येऊन बोललो होतो की, ‘काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा!’ …आज ते सिद्ध करून दाखवलं! पण मला आनंद होतोय तुमच्यासाठी. ‘त्या’ सगळ्या काळात तुम्ही मायबाप प्रेक्षक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात. मला पूर्वीपेक्षा शंभरपटींनी प्रेम दिलंत. त्यामुळं आज या क्षणी नम्रपणे तुम्हा चाहत्यांच्या पायाशी रहाणं, हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचं असेल.’








