
अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या लूकची झलक शेअर केली आहे. ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या या नव्या पोस्टरवर ‘हकीमचाचा’च्या रुपात किरण माने दिसत आहेत. डोक्याला काळा फेटा, पांढरी दाढी आणि शेला या लूकमध्ये किरण माने एका करारी भूमिकेत दिसणार आहेत. ‘रावरंभा’ या चित्रपटाचे हे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘मालिका, चित्रपट, नाटकांमधून चाहत्यांची मनं जिंकणारे बिग बॉस फेम मराठीतील प्रतिभावंत आणि हरहुन्नरी अभिनेते किरण माने ‘हकीमचाचा’ च्या अनोख्या भूमिकेत..’रावरंभा’ १२ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात..!’






