Kerala Mob Lynching Case | केरळमध्ये जमावाकडून स्थलांतरित कामगाराची हत्या, खांबाला बांधून बेदम मारहाण; दहा जणांना अटक! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Kerala Mob Lynching Case | केरळमध्ये जमावाकडून स्थलांतरित कामगाराची हत्या, खांबाला बांधून बेदम मारहाण; दहा जणांना अटक! | Navarashtra (नवराष्ट्र)


या कामगारावर जमावाने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या कामगाराल रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

केरळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. केरळमध्ये अरुणाचल प्रदेशमधील रहिवासी असलेला एक कामगार  (Maigrant Worker) मॉब लिंचिंगचा बळी (Kerala Mob Lynching Case) ठरला आहे. या कामगारावर त्याच्या माजी महिला सहकारीच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप करत जमावाने त्याला  झाडाला बांधून मारहाण केली. जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या कामगाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी केरळ पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमका प्रकार काय

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री घडली. २४ वर्षीय अशोक दास केरळमधील मुवट्टुपुझा येथे कामगार म्हणून काम करत होता. अशोक दास हा मूळचेाअरुणाचल प्रदेशचा. मात्र तो बराच काळ येथे राहून आपला उदरनिर्वाह करत असे. तो मुवट्टुपुझा येथील वलकम येथे भाड्याच्या घरात राहत होता. गुरुवारी रात्री तो त्याच्या माजाी महिला सहकारीच्या घरी गेला. तिथे त्याचा महिला सहकारीसोबत वाद झाला. यावेळी त्यांनं चांगलात गोंधळ घातला. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकं जमा झाली. लोकांनी केलेल्या मारहाणीत कामगाराचा मृत्यू झाला.






Source link