KBC 16 : एका चुकीमुळे सौरभने गमावले ५० लाख रुपये! क्रिकेटशी संबंधित ‘या’ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीय?

0
19
KBC 16 : एका चुकीमुळे सौरभने गमावले ५० लाख रुपये! क्रिकेटशी संबंधित ‘या’ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीय?


Kaun Banega Crorepati 16 Latest Update : ‘कौन बनेगा करोडपती १६’ हा शो सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या शोमध्ये येणाऱ्या लोकांचे नशीब क्षणार्धात बदलते. कालच्या शोमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. बंगालमधून आलेल्या सौरभने त्याच्या ज्ञानाच्या जोरावर २५ लाख रुपये जिंकले. मात्र, ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकले आणि त्याची मोठी संधी हुकली. सौरभ हा अतिशय गरीबीचं जीवन जगत होता. तो एका चाळीतील छोट्याशा घरात राहतो. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने २५ लाख रुपये जिंकले. मात्र, क्रिकेटशी संबंधित एका प्रश्नावर तो अडकला आणि यामुळे त्याची ५० लाख रुपये जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली.



Source link