
कर्नाटकमध्ये एका डॅाक्टरनं ऑपरेशन थिएटरमध्ये प्री वेडींग फोटोशूट केलं. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने डॉ.अभिषेकला निलंबित केले.
आजकाल प्री-वेडिंग (karnataka doctor pre wedding shoot) शूट खूप लोकप्रिय झालं आहे. आपले फोटो सगळ्यात वेगळे आणि खास असावेत यासाठी कपल अनेक वेगवेगळे प्रयोग करतात. याबाबतील कर्नाटकातील डॅाक्टरने लढवलेली शक्कल खूपच भन्नाट होती मात्र हा फोटोशूट साठी केलेला अतिउत्साहीपणा आता त्यालाच नडला असून त्याला त्याची नोकरीही गमवावी लागली आहे. बघुया नेमकं काय केलं त्याने.
हे सुद्धा वाचा
नेमका प्रकार काय
कर्नाटकातील एका डॉक्टरने चित्रदुर्ग जिल्ह्यातील भरमसागर येथील सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्या जोडीदारासोबत प्री-वेडिंग शूट केलं. मात्र असं करणं त्याच्या चांगलच अंगलट आलं आहे. यावेळी दाम्पत्याने खऱ्या वैद्यकीय उपकरणांसह बनावट शस्त्रक्रिया केल्याचा बनाव केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समाेर आल्यानंतर कर्नाटक सरकारने डॉ.अभिषेकला निलंबित केले.









