Karan Johar: करण जोहर बनवणार ‘स्टुडंट ऑफ द इयर ३’! आता ‘या’ स्टारकिडला करणार लाँच

0
66
Karan Johar: करण जोहर बनवणार ‘स्टुडंट ऑफ द इयर ३’! आता ‘या’ स्टारकिडला करणार लाँच


सध्या करण जोहर आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटानंतर तो एका अॅक्शन चित्रपटाची तयारी करत आहे. या अॅक्शनपटात तो केवळ निर्माता असणार आहे. २०१२मध्ये करणने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ दिग्दर्शित केला होता आणि त्यात आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा लाँच केले होते. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते. ‘स्टुडंट ऑफ द इयर २‘ हा चित्रपट २०१९मध्ये रिलीज झाला होता. याचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा यांनी केले होते. यामध्ये टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यांना करण जोहरने लाँच केले होते.



Source link