Karachi Fire: कराचीतील शॉपिंग मॉलला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू; एक जखमी

0
19
Karachi Fire: कराचीतील शॉपिंग मॉलला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू; एक जखमी


शरिया फैसल स्टेशन हाऊस ऑफिसर राजा तारिक मेहमूद यांनी डॉन न्यूज दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीला आग लागली, ती मोठी व्यावसायिक इमारत होती. इमारतीच्या आत शॉपिंग सेंटर्स, कॉल सेंटर्स आणि सॉफ्टवेअर हाऊस होती. आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास या इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. यानंतर अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.सिंधचे महानिरीक्षक रिफत मुख्तार यांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना इमारतीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या सूचना दिल्या. अग्निशमन दलाला कोणतीही अडचण न होता तिथे पोहोचता यावे, यासाठी रस्ता मोकळा करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.



Source link