
का करण्यात आली कंगनाची निवड?
यावेळी रावण दहनासाठी कंगनाची निवड का करण्यात आली? या मागचे कारण दिल्लीच्या लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी सांगितले होते. “लव कुश रामलीला समितीला असे वाटते की महिलांना समान अधिकार असायला हवे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे, पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे. महिला आरक्षण विधेयक देश आणि समाजाच्या विकासात मदत करेल. आता एक महिलाही रावण दहन करू शकते. ती वाईट गोष्टींचाही अंत करू शकते. महिलांनाही हा अधिकार दिला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही कंगनाची निवड केली” हे कारण सांगितले.








