
केआरकेने कंगनाच्या लग्नाबाबत ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्याने ‘अभिनेत्री कंगना रनौत हिचा साखरपुडा डिसेंबर २०२३ मध्ये उद्योजकासोबत होणार आहे. एप्रिल २०२४ मध्ये कंगना विवाहबंधनात अडकणार आहे…! तिला खूप शुभेच्छा…!’ असे म्हटले आहे. सोशल मीडियावर या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, कंगनाने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.








