
kalyan Crime : कल्याण येथे सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून पडल्याने पुण्यातील एका तरुण बँक कर्मचाऱ्याचा सोमवारी मृत्यू झाला होता. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी नसल्याने या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, रेल्वेतून प्रवास करत असतांना फटका गँगच्या एका मोबाइल चोराने मृत व्यक्तीच्या हाताला मारून त्यांचा मोबाइल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या चोरला पकडण्यासाठी धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने गंभीर जखमी होऊन प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मोबाइल चोराला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.