
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती तोरडमल असे मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचे नाव असून ती घाटकोपर येथील रहिवाशी आहे. ज्योती ही काल दुपारी ३.३० वाजताच्या भूपेंद्र गिरी नावाच्या व्यक्तीसह कल्याण रेल्वे स्थानकाजवळील तृप्ती लॉजमध्ये आली. त्यानंतर भुपेंद्र जेवण पार्सल आणण्यासाठी जात असल्याचे सांगून तिथून निघून गेला. आज सकाळी लॉजच्या वेटरने रुम सर्व्हिससाठी ज्योती थांबलेल्या रुमचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतमधून कोणताही प्रतिसाद आला नाही. तसेच रुमचा दरवाजा उघडा असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने रुममध्ये जाऊन पाहिले असता ज्योती मृतावस्थेत आढळून आली. त्याने त्वरीत लॉजच्या मालकाला याबाबत माहिती दिली. लॉज मालकाने घडलेला सगळा प्रकार महात्मा फुले पोलिसांना कळवला.






