
सनी, त्याचे मित्र किल्विश (आसिफ खान) आणि इंदू ठरवतात की ज्या दिवशी लग्न होणार आहे, त्या दिवशी सनी आपल्या वडिलांवर दरवाजा उघडा ठेवून, दारात बसण्याची जबाबदारी देईल, जेणेकरून ‘काकुडा’चा शापही टाळता येईल आणि मुहूर्ताच्या दिवशी लग्नही होईल. पण, कथेत ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा सनीला कळते की, त्याचे वडील तीर्थयात्रेला जात आहेत. इंदूच्या दबावामुळे सनी रिस्क घेऊन, दुसऱ्या गावात लग्नासाठी जातो. घाईघाईत लग्न पार पडते आणि सनी आपल्या गावी येतो. पण, त्याला उशीर होतो आणि ७.१५ वाजता त्याला घराचा दरवाजा उघडता येत नाही. त्याचा परिणाम असा होतो की, त्याला ‘काकुडा’चा शाप लागतो आणि सनीच्या पाठीवर कुबड येते.







