
काजल अग्रवालचा जन्म १९ जून १९८५ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. काजलचे शिक्षण मुंबईतील सेंट अॅन्स हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर तिने’ केसी कॉलेज मुंबईतून मास मीडिया स्ट्रीममध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. काजलने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. काजलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला लहानपणापासूनच पत्रकार बनायचे होते. पण, काळाच्या ओघाने तिला अभिनेत्री बनवले. चित्रपटात येण्यापूर्वी काजलने एमबीएचे शिक्षण घेण्याची योजना आखली होती. पण, त्यातही ती अयशस्वी ठरली.







