
कैलाश खेर पुढे म्हणाले की, ‘जर आम्हाला गाणं म्हणायला बोलावलं असेल, तर सांगा की दीड तास फक्त आमचा आहे. आता लक्ष न दिल्यास हे असेच सुरू राहणार आहे. गरज असेल तिथे आणखी कमांडो गिरी दाखवा. लक्षात ठेवा, आम्ही जगतो भारतासाठी, मरणार फक्त भारतासाठी…’ कैलाश खेर सुमारे तासभर जॅममध्ये अडकले होते. इतकंच नाही, तर त्यांच्या कर्मचार्यांना पोलिसांनी रोखलं, त्यानंतर हे प्रकरण आणखी वाढलं होतं.








