K. Kasturirangan : इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन; राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात होते योगदान

0
17
K. Kasturirangan : इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन; राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात होते योगदान

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे आज (शुक्रवार, २५ एप्रिल) सकाळी बंगळुरू येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत, अशी माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून ते वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव रामन रिसर्च इन्स्टिट्यूट /येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Source link