JP Nadda | वाराणसीत सापडली भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची चोरी गेलेली कार, २ जणांना अटक! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
5
JP Nadda  | वाराणसीत सापडली भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची चोरी गेलेली कार, २ जणांना अटक! | Navarashtra (नवराष्ट्र)


वाराणसीत सापडली भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची चोरी गेलेली कार, २ जणांना अटक!

दिल्ली पोलिसांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची एसयूव्ही कार उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून काही काळापूर्वी चोरीला गेली होती. कार चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून काही काळापूर्वी चोरीला गेलेली एसयूव्ही कार जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा यांची पत्नी मल्लिका नड्डा यांची फॉर्च्युनर कार दिल्लीतील गोविंदपुरी परिसरातून १९ मार्च रोजी चोरीला गेली होती.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार,  दिल्ली पोलिसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार दिल्लीतून चोरीला गेल्याच्या काही आठवड्यांनंतर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी ही कार हरियाणा, हिमाचल आणि यूपीमार्गे नागालँडला नेण्याचा प्रयत्न करत होते.






Source link