
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार 2023 या आर्थिक वर्षात सरकारी तसेच खासगी बँकांनी तब्बल 1,23,000 नोकऱ्या दिल्या. 2022 च्या तुलनेत बँक कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 61 टक्क्यांनी वाढली आहे.
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार 2023 या आर्थिक वर्षात सरकारी तसेच खासगी बँकांनी तब्बल 1,23,000 नोकऱ्या दिल्या. 2022 च्या तुलनेत बँक कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 61 टक्क्यांनी वाढली आहे. वार्षिक आकडेवारीचा विचार करता एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 7.4 टक्क्यांनी वाढून 17.6 लाखांवर पोहोचली आहे.
स्टाफिंग एजन्सी एक्सफेनोच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार सर्वांत मोठ्या 15 बँकांनी 2023 मध्ये प्रत्येक दिवशी सरासरी 350 कर्मचाऱ्यांची भरती केली. यात एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस, इंडसइंड, आयडीएफसी फर्स्ट, बंधन व एयू बँक आदींचा समावेश आहे.









