
manusmriti shlok in Maharashtra Schools books : नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शालेय शिक्षणाच्या पुस्तकात ‘एससीईआरटी’ने मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्थावावर आक्षेप, हरकती आणि सूचना देखील मागवण्यात आल्या आहे. दरम्यान, या निर्णयावरून आता वाद होण्याची चिन्हे आहेत. एनसीईआरटीईच्या या प्रस्तावाला राष्ट्रवाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला असून या विरोधात ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनूस्मृतीची होळी केली होती, त्या महाड येथे आव्हाड देखील मनुस्मृतीची होळी करून ते सरकारच्या या निर्णयाचा निषेध करणार आहेत.





