
Salman Khan on Jawan prevue: बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षि ‘जवान’ या चित्रपटाचा प्रीव्ह्यू नुकताच रिलीज झाला आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शाहरुख खानचे चाहते त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहे. शाहरुख खानसोबतच या चित्रपटात नयनतारा, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती आणि प्रियामणी यांच्याही भूमिका आहेत. तर, दीपिका पदुकोण या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या उत्साहात आणखी भर पडली आहे. या चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यानंतर शाहरुखचे कौतुक करण्यापासून सलमान खान देखील स्वतःला रोखू शकलेला नाही.







