
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला आणि सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ‘डंकी’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाविषयी अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ‘पठान’ आणि ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल, असे म्हटले जात आहे. या यादीतील पुढचा चित्रपट हृतिक रोशन स्टारर ‘फायटर’ आहे. हृतिकचा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे. तर, पाचव्या क्रमांकावर ईदला येत असलेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा समावेश आहे.








