
‘जाऊ बाई गावात’ या बहुचर्चित शोच्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात रमशा फारुकी ही महाविजेती ठरली. रमशाला २० लाखाचा धनादेश आणि जाऊ बाई गावातची मानाची ट्रॉफी देण्यात आली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. रमशाने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, “Oh My God! तो क्षण जेव्हा सरानी माझे नाव घेतले आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि ‘जाऊ बाई गावातच्या’ पहिल्या पर्वातली विजेती आहे रमशा. तेव्हा मला वाटत होते की मी स्वप्न पाहत आहे. कारण गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटले खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता ‘इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरी ने इससे मुझे मिलाने की साज़िश की है” खरच बेस्ट मोमेन्ट आहे लाईफचा. मी स्वतःला हेच म्हणाली की ही फक्त सुरवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचे आहे आणि जसे ‘जाऊ बाई गावात’ या शोला १०० % दिले आहे तसच पुढे ही दयायच आहे. कारण यशासाठी कुठचा ही शॉर्टकट नाही. माझ्या धन्यवादाची लिस्ट खूप मोठी आहे सुरवात गावकऱ्यांपासून करेन मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली, थोडक्यात सुखी कसे राहायचे हे शिकवले. मी कधी विचारही केला नव्हता की कोणी इतके आपल्यावर प्रेमही करू शकते.”







