
Jau Bai Gavaat Hardeek Joshi: छोट्या पडद्यावर एका नवाकोरा अन् आगळावेगळा असा ‘जाऊ बाई गावात‘ हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता हार्दिक जोशी यांच्या हाती देण्यात आली आहे. या शोमध्ये शहरात आणि परदेशात सगळ्या सुखसुविधांचा वापर करून लहानाच्या मोठ्या झालेल्या काही तरुणी थेट गावात जाऊन कुठलीही सुविधा न वापरता तिथल्या लोकांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान अनेकदा वादांच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. ‘जाऊ बाई गावात’च्या निमित्ताने हार्दिक जोशी पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसला आहे. या कार्यक्रमाची ऑफर आली तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती, यावर हार्दिक जोशी पहिल्यांदाच बोलला आहे.








