
mahatma jyotirao phule jan arogya yojana : महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू असून लक्षवेधीच्या माध्यमांतून आमदार सत्यजीत तांबेंनी डेंटल उपचारांचा देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्याची मागणी केली. आमदार सत्यजीत तांबेंची मागणी लक्षात घेऊन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या योजनेत डेंटल उपचारांचा देखील समावेश करण्याचे आश्वासन दिले. आरोग्य योजनेचा लाभ घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रुग्णालये बोगस रुग्ण दाखवून योजनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात या सगळ्यावर सरकार कशाप्रकारे आळा घालणार, असा सवाल आमदार सत्यजीत तांबेंनी सभागृहात उपस्थित केला.





