
Jammu Kashmir Accident : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात लष्कराचे ५ जवान शहीद झाले. तसेच अनेक जवान जखमी झाले. बलनोई भागात लष्कराचे वाहन जवळपास ३०० फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. पोलीस आणि लष्कराच्या पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे.








