
मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जालन्यातील आंतरवली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यावरून विरोधी पक्ष राजकारण करत आहे. लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आल्याचं काही लोक सांगत आहे. परंतु जे लोक असं म्हणत आहे, त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करून दाखवावं. आरोप सिद्ध झाल्यास आम्ही त्यांच्या सगळ्या बाजू ऐकून घेऊ, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच सध्या शांततेची आणि आंदोलन थांबण्याची गरज असल्याचं सांगत अजित पवारांनी मराठा संघटनांना संयमाने भूमिका घेण्याची विनंती केली आहे.





