
गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशात सर्वत्र नवरात्रीचं मंगलमय वातावारण असून रास गरबा, दांडियाची धूम आहे. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात जळगावातून एक दु:खद घटना समोर आली आहे. जळगावातील पाचोरा शहरात एका २७ वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.