
राणी सरदार चव्हाण (३०), सोमेश सरदार चव्हाण (२), सोहन सरदार चव्हाण (७), आणि लक्ष्मण भास्कर राठोड (१२ सर्व रा. रामदेववाडी, जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटूंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवते. मंगळवारी ( ७ मे) रोजी राणी चव्हाण या दोन्ही मुले सोहन व सोमेश चव्हाण आणि लक्ष्मण भास्कर राठोड (१२) यांच्यासह जळगावकडे कामानिमित्त चालल्या होत्या. गावाच्या बाहेर आल्यावर समोरून आलेल्या भरधाव कारने (एम एच १९ सी.व्ही. ६७६७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिन्ही मुले एका बाजूला फेकले गेले. त्यात राणी चव्हाण व सोमेश या रस्त्यावर आपटून जागीच ठार झाले. त्यासह डोक्याला मार लागल्याने सोहन याचादेखील मृत्यू झाला.







