Jagdeep Dhankhar : मिमिक्री एक कला आहे; उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवणाऱ्या TMC खासदाराचा माफी मागण्यास नकार

0
18
Jagdeep Dhankhar  : मिमिक्री एक कला आहे;  उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवणाऱ्या TMC खासदाराचा माफी मागण्यास नकार


उपराष्ट्रपती जगदीप धनखडयांची संसद परिसरात मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवण्याच्या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान मोदींपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मिमिक्री करणारे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेवरून कल्याण बॅनर्जी यांनीमाफी मागण्यास नकार देत म्हटले आहे की, मिमिक्रीही एक कला आहे. धनखड यांनी हे स्वत:वर का घेतले माहीत नाही. पंतप्रधान मोदींनी स्वत: २०१४ ते २०१९ दरम्यान अनेक सभांमध्ये अशाप्रकारचे कृत्य केले आहे.



Source link