
इस्त्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी सोमवारी हिजबुल्लाच्या दोन स्थानांवर हल्ला केला. या तळांवरून हिजबुल्लाचे दहशतवादी इस्रायलवर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि रॉकेट डागण्याचा कट रचत होते. इस्रायलने सोमवारी गाझामधील अनेक लक्ष्यांवर हल्ले केले. पॅलेस्टिनी मीडियानुसार या हल्ल्यांमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
हमासनंतर इस्रायलन (Israel Hamas War) आता लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने गाझामधील हमासच्या स्थानांवर आणि दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या स्थानांवर हल्ले केले. या हल्ल्यात लेबनॉनमधील हिजबुल्लाह कमांडर ठार झाला. हिजबुल्लाशी संलग्न असलेल्या अल-मनार टीव्हीने हा दावा केला आहे. याआधी इस्रायलने हमासच्या तोफखानाचा डेप्युटी कमांडर मुहम्मद कटमाश याला ठार केले होते.
हे सुद्धा वाचा
इस्त्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी सोमवारी हिजबुल्लाच्या दोन स्थानांवर हल्ला केला. या तळांवरून हिजबुल्लाचे दहशतवादी इस्रायलवर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि रॉकेट डागण्याचा कट रचत होते.









